Why to worry and have wrinkles, when you can smile and have dimples...... Why to worry and have wrinkles, when you can smile and have dimples...... Why to worry and have wrinkles, when you can smile and have dimples......
Start your day with a fresh joke

Friday, 29 May 2009

फेडरल जज

एकदा एका फेडरल जजची कार रात्री उशीरा शहरापासून दुर फेल पडली. तो जज जवळच असलेल्या एका फॉर्म हाऊसवर मदत मिळेल या आशेने गेला. तिथे एक सुंदर स्त्री राहत होती. ती म्हणाली की ती तिथे एकटी राहते त्यामुळे त्याला गॅरेज वैगेरे उघडण्यासाठी सकाळपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 

'' मग त्या परिस्थीतीत मी तुमची मला रात्रभर इथे राहू देण्यासाठी विनंती करतो'' तो जज म्हणाला.

'' पण सर मी इथे एकटी आहे'' ती स्त्री म्हणाली.

'' भ्यायची काही गरज नाही शेवटी मी कोर्टाचा एक फेडरल जज आहे'' तो जज म्हणाला.

'' पण सर इथे फक्त एकच बेडरुम आहे'' ती स्त्री म्हणाली.

'' भ्यायची काही गरज नाही शेवटी मी कोर्टाचा एक फेडरल जज आहे'' तो जज म्हणाला.

ते दोघे बेडरुमकडे गेले आणि ती स्त्री म्हणाली, '' पण सर इथे तर फक्त एकच बेड आहे''

'' भ्यायची काही गरज नाही शेवटी मी कोर्टाचा एक फेडरल जज आहे'' तो जज म्हणाला.

म्हणून ते रात्री एकाच बेडवर एकमेकांकडे पाठ करुन झोपले. 

सकाळी उठल्यावर जेव्हा जजने त्या स्त्री सोबत फॉर्म हाऊसच्या परिसरात एक चक्कर मारली, एका जागी त्याला कोंबड्यांचा कळप दिसला. पण जवळ जावून बघितल्यावर जजच्या लक्षात आले की त्या कळपात फक्त 20 कोंबड्या आहेत आणि जवळपास 60 कोंबडे आहेत. त्याला ते जरा विचित्रच वाटलं म्ह्णून त्याने त्या स्रीला विचारले, '' 60 कोंबडे आणि फक्त 20 कोंबड्या जरा विचित्रच वाटते नाही''

'' त्यात काय विचित्र... त्या 60 कोंबड्यांपैकी फक्त 10 कामाचे कोंबडे आहेत.''

'' आणि बाकी 50'' जजने विचारले

'' आणि बाकी 50 फेडरल जज आहेत'' त्या स्त्रीने उत्तर दिले.

No comments:

Post a Comment

Template by - Shailesh Puranik